सिंहगडरस्ता –अतिक्रमण विषयी आम्ही नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत आणि कार्यवाही सुरू आहे. ज्यांना नोटिसा मिळाल्या त्या नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यास सुरूवात केली असल्याचे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण अधिकारी धम्मदिप गायकवाड यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासक आल्यापासून शहरामध्ये अतिक्रमण काढण्याचे काम महापालिकेतर्फे जोरात सुरू आहे. सिंहगड रस्त्यावरही अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे. इतर ठिकाणी होत असलेली कारवाई पाहता, नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यायला सुरुवात केली आहे. सिंहगड रस्ता भागात नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतली आहेत. त्यानंतरच्या फॅब्रिकेशन सारखी डागडुजी, दुरस्तीची कामे रात्रं-दिवस सुरू आहेत.
दरम्यान, नोटीसा पाठवल्यानंतर नागरिकांकडून अतिक्रमण विभागास सहकार्य केले जात आहे. कारवाईपूर्वीच अतिक्रमण हटविण्यात येत असल्याने महापालिका तसेच पोलीस प्रशासनावरील ताणही कमी झाला आहे.