मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे – इंदुरीकर

नगर – लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहे. त्यांनी एका कीर्तनात सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते तसेच टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब होते, असे वक्तव्य केले होते.

दरम्यान, इंदुरीकर महारांजावर या वक्तव्यामुळे पीसीपीएनडिटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्यानुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली होती.

याबाबत इंदुरीकर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,’ यूट्यूबवाल्यांना इंदुरीकराच्या नावाने पैसा मिळाला, तसेच समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी ही भागवतातही खरंय, ज्ञानेश्वरीतही खरंय. मी म्हणतोय हे खरंय. तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो, आपली आता कपॅसिटी संपली. उद्या-परवाचा दिवस बघायचं, ठेऊन द्यायचा फेटा, आता शेतीच करायची. बस्स.. आता नको मजा नाही राहिली,’ असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

इंदुरीकर पुढे म्हणाले, ‘दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन,’ असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.