नवी दिल्ली – करोनामुळे गेल्या वर्षी जागतिक क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या होत्या. मात्र, यंदाच्या वर्षी याच स्पर्धा सुरळीत होणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
करोनामुळे एक वर्षाने लांबणीवर पडलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा तसेच युरो चषक फुटबॉल, पुरुष आणि महिला टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा यांसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धा यंदा चाहत्यांसाठी मेजवानी ठरणार आहे.
यंदाच्या जागतिक स्पर्धांचे वेळापत्रक
विश्वकरंडक फुटबॉल – 1 ते 11 फेब्रुवारी (कतार)
इंग्लंडचा भारत दौरा – 5 फेब्रुवारी ते 14 मार्च
ऑस्ट्रेलियन टेनिस – 8 ते 21 जानेवारी
फ्रेंच टेनिस – 23 मार्च ते 6 जून
युरो चषक फुटबॉल – 11 जून ते 11 जुलै
कोपा अमेरिका फुटबॉल – 11 जून ते 11 जुलै
विम्बल्डन – 28 जून ते 11 जुलै
टोकियो ऑलिम्पिक – 23 जुलै ते 8 ऑगस्ट
टोकियो पॅरालिम्पिक – 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर
टूर डी फ्रान्स सायकल स्पर्धा – 26 जून ते 18 जुलै (फ्रान्स)
महिला युरो चषक फुटबॉल – 7 जुलै ते 1 ऑगस्ट
जागतिक ऍथलेटिक्स – 6 ते 15 ऑगस्ट (अमेरिका)
जागतिक मुष्टियुद्ध – ऑगस्ट महिन्यात शक्य (भारत)
अमेरिकन टेनिस – 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर
टी-20 विश्वकरंडक – 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर
जागतिक जलतरण – 13 ते 18 डिसेंबर
इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लीगा, बुंदेसलीगा, फ्रेंच लीग – ऑगस्ट
एटीपी टेनिस – 14 ते 21 नोव्हेंबर (ठिकाण अनिश्चित)
आयपीएल – एप्रिल व मे (भारत)
प्रो कबड्डी लीग – वेळापत्रक आणि ठिकाण अनिश्चित
जागतिक तिरंदाजी – 16 ते 26 सप्टेंबर (ठिकाण अनिश्चित).