माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ही बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. मानुषीचे म्हणणे आहे की, ती डायरेक्टर एस.एस. राजमौली यांच्या चित्रपटांची खूप मोठी फॅन आहे आणि ती सतत त्यांचे चित्रपट पाहत असते.
मानुषी म्हणाली, मला आशा आहे की एक दिवस एसएस राजमौली माझ्या कामाने प्रेरित होतील आणि मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल. मानुषी छिल्लर म्हणाली, राजमौली सर हे सध्याच्या घडीला सर्वाधिक उत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत.
View this post on Instagram
Stoked to be joining the #adidas family /// team #threestripes forever 💪 @adidas
मी त्यांच्या कामामुळे त्यांची मोठी प्रशंसक आहे. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला सदैव स्मरणात राहतील अशा काही दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. “बाहुबली’ आणि “मगधीर’ हे माझे सर्वाधिक आवडीचे चित्रपट आहेत. मी हे चित्रपट सतत पाहू शकते.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास मानुषी छिल्लर ही अक्षय कुमारसोबत “पृथ्वीराज’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. हा चित्रपट राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. यात अक्षय कुमार हा पृथ्वीराज चौहान आणि मानुषी छिल्लर ही संयोगिताच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय मानुषी अन्य एका चित्रपटात विकी कौशलसोबत काम करत आहे.