जिनिव्हा – मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी युनिसेफने माजी जगत् सुंदरी मानुषी छिल्लर हिला सदिच्छादूत म्हणून नेमले आहे. मुलींसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छता सुविधा निर्माण करणं आणि स्वच्छता विषयक उत्पादने त्वरित उपलब्ध होणे, यासाठी ती कार्य करेल. या गंभीर विषयावर जनजागृती करणे महत्त्वाचे आहे,असे मानुषीने यानिमित्ताने सांगितले. ती स्वतः भारतातल्या अनेक राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रोजेक्ट शक्ती या प्रकल्पाची प्रवर्तक आहे.
‘प्रोजेक्ट शक्ति’ हा प्रकल्प मासिक पाळीबाबत जागृती करण्यासाठी देशातील अनेक राज्यांत सुरू आहे.
ती मासिक पाळीबाबत जनजागृती करणार आहे, त्या युनिसेफच्या प्रकल्पाचे नाव “रेड डॉट चॅलेंज’ असे आहे. यापूर्वी, दीया मिर्झा, डायना पेंटी, मृणाल ठाकूर, आदिती राव हैदरी, कुब्रा सैत, नीरू बाजवा या अभिनेत्रींनी “रेड डॉट चॅलेंज’मध्ये भाग घेतला होता. मानुषी छिल्लर लवकरच अक्षय कुमारच्याबरोबर “पृथ्वीराज चव्हाण’ या ऐतिहासिक विषयावरील बॉलिवूडपटामध्ये पदार्पण करणार आहे. त्यामध्ये ती राजकुमारी संयोगिताचा रोल करणार आहे.