पाबळ – येथील पाबळ येथील विज्ञान आश्रम संस्थेत आयोजित प्रदर्शनात कचऱ्यावर दह्यासारखे विरजन वापरून त्यातून खतनिर्मिती करणारा प्रकल्प सादर करण्यात आला. प्रदर्शनात या प्रकल्पाला दाद मिळाली. अनेकांना रोजगार व सार्वजनिक उद्योग उभारणीस मदतकारक ठरणार आहे. हे खत आठ ते दहा रुपये किलो दराने विकले जाते. या प्रक्रियेची व मोठ्या कचरा उद्योगासाठीचा प्रकल्प प्रयोगाधीन असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख सोनल शिंदे हिने दिली.
येथील विज्ञान आश्रम संस्थेचे प्रवर्तक डॉ. श्रीनाथ कलबाग यांच्या स्मृतिदिनानिमित्त 16 वे खुले प्रदर्शन भरविले होते.
प्रदर्शनात शेती आणि कचरा प्रक्रिया या दोन प्रकल्पास यश संस्थेने मिळवले. प्लॅस्टिकपासून तेलनिर्मिती हा प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केला. विद्यार्थी, शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे दोन दिवस प्रदर्शन खुले ठेवले होते. यावेळी आयआयइचे अध्यक्ष अडसूळ, उपाध्यक्ष डॉ. कळके, विश्वस्त डॉ. निकम, विज्ञान आश्रमचे कमिटी सदस्य डॉ. आळतेकर, सी. टी. बोरा कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहिते, अशोक कलबाग, मुख्य संचालक योगेश कुलकर्णी, गीताराम कदम, रणजीत शानभाग, अरुण दीक्षित उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल जगताप, राहुल जगताप, सचिन पुणेकर, लक्षमण जाधव, गणेश पिंगळे, सुयोग वारघडे यांनी परिश्रम घेतले.