नवी दिल्ली – जुलै महिन्यातील मॅन्युफॅक्चरिंग उत्पादकता निर्देशांक कमी झाला. या क्षेत्रातील पर्चेसिंग मॅनेजर इंटेक्स( पीएमआय) जुलै महिन्यात 46 इतका नोंदला गेला आहे. जून महिन्यात तो 47.20 इतका होता. हा निर्देशांक 50 च्या वर असेल तर हे क्षेत्र विस्तारत आहे असे समजले जाते. 4 महिन्यांपासून हा निर्देशांक कमी आहे.