सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतिपदांच्या निवडी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सकाळी नऊच्या सुमारास बैठक झाली.
दरम्यान, सभापतिपदांच्या निवडी झाल्या असून शिक्षण व अर्थ समिती सभापतिपदी ज्येष्ठ सदस्यमानसिंगराव जगदाळे (मसूर-कराड) यांची निवड झाली. तर कृषी सभापतिपदी मंगेश धुमाळ (पिंपोडे बुद्रुक) यांची तर महिला व बालकल्याण सभापतिपदी सोनाली पोळ (मार्डी माण) यांची निवड झाली. समाज कल्याण सभापतिपदी कल्पना खाडे (निमसोड) यांची वर्णी लागली आहे.