मानसी, कुणाल यांच्याकडे पुणे जिल्हा संघांचे नेतृत्व

राज्य बास्केटबॉल स्पर्धा

पुणे, दि. 27 – पुण्यात उद्यापासून (शनिवार) सुरू होत असलेल्या मिनी गटाच्या (13 वर्षांखालील) राज्य अजिंक्‍यपद व आंतरजिल्हा निवड चाचणी बास्केटबॉल स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याच्या मुली व मुलांच्या संघाचे नेतृत्व मानसी निंबाळकर आणि कुणाल भोसले यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष ललित नहाटा यांनी या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रत्येकी 12 खेळाडूंचे मुली व मुलांचे संघ आज जाहीर केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आनंद कुलकर्णी मुलींच्या संघाचे प्रशिक्षक असतील, तर सुरेश शेलार सहप्रशिक्षक असतील. मुलांच्या संघाची जबाबदारी चैतन्य दीक्षित यांच्याकडे सोपविण्यात आली असून सहप्रशिक्षक अरुण पवार त्यांना साहाय्य करतील. ललित नहाटा आणि हृषिकेश दीक्षित हे अनुक्रमे मुली व मुलांच्या संघाचे व्यवस्थापक असतील.आगामी राष्ट्रीय अजिंक्‍यपद बास्केटबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे संघ निवडण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन 28 जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत पुण्यात करण्यात आले आहे. महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटना आणि एन. जे. बास्केटबॉल अकादमी यांनी संयुक्‍तपणे ही स्पर्धा आयोजित केली आहे. शिवछत्रपती क्रीडासंकुल, बालेवाडी येथे रंगणाऱ्या या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येतील.

पुणे जिल्ह्याचे संघ- 13 वर्षांखालील मुली- 1) मानसी निंबाळकर (कर्णधार), 2) वंशिका गोठी, 3) देवांशी लुणावत, 4) आश्‍लेषा गोटे, 5) तन्वी साळवे, 6) भूमिका सर्जे, 7) श्‍वेता देशपांडे, 8) शांभवी शिंदे, 9) सई ब्राह्मणकर, 10) आर्या भाटे, 11) अनिका माजगावकर व 12) दिव्या सेठिया, प्रशिक्षक- आनंद कुलकर्णी, सहप्रशिक्षक- सुरेश शेलार, व्यवस्थापक- ललित नहाटा.

13 वर्षांखालील मुले- 1) कुणाल भोसले (कर्णधार), 2) शार्दूल पाठक, 3) मीत मुनोत, 4) आर्यन पाटील, 5) अनिश धूत, 6) आर्यराज भोसले, 7) क्षितिज मोरे, 8) अन्वित शिंदे, 9) मेघ अत्रे, 10) यश पंडित, 11) ऋग्वेद साखरे व 12) आर्यन लिमये, प्रशिक्षक- चैतन्य दीक्षित, सहप्रशिक्षक- अरुण पवार, व्यवस्थापक- हृषिकेश दीक्षित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)