Maharashtra Elections 2019 : मनसेच्या पहिल्या यादीत पुण्याचा चौकार

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली 27 उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली. यात पुण्यातील चार मतदारसंघात उमेदवार देण्यात येणार आहेत, बहुचर्चित कोथरूड मतदारसंघातूण किशोर शिंदे यांना मैदानात उतरवून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. त्याचबोबर हडपसरमधून पालिका गटनेते वसंत मोरे, कसब्यातून शहराध्यक्ष अजय शिंदे तर शिवाजीनगरमधून सुहास निम्हण यांना मैदानात उतरवल.

मंत्रालयात विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांची उमेदवारी मनसेने काल जाहीर केली होती. त्यांना सिंदखेडामधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रमोद पाटील यांना कल्याण ग्रामीणमधून, प्रकाश भोईर यांना कल्याण पश्‍चिममधून, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे. या शिवाय मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे नेते गजानन काळे यांना बेलापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.