पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील १४ दिवस त्यांचा मुक्काम येरवडा कारागृहात असेल. हे आदेश पौड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बरडे यांनी दिले.
मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मनोरमा, पती दिलीप खेडकर, अंगरक्षकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या मनोरमा यांना महाड परिसरातून पोलिसांनी अटक केली.
याबाबत संबंधित शेतकऱ्याने फिर्याद दिली होती. मनोरमा यांच्या पोलीस काेठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने शनिवारी (१९ जुलै) दिले हाेते. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.