मनोज घोरपडे यांना आमदार करू या – सौ. माने-कदम

कामेरी  – कराड उत्तर मतदारसंघातून भाजप नेते मनोज घोरपडे यांना आमदार करू या, असे आवाहन रहिमतपूर येथील पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष सौ. चित्रलेखा माने-कदम यांनी केले.

कराड उत्तरमधील भाजप महिला पदाधिकाऱ्यांची बैठक आज हॉटेल प्रीती एक्‍झिक्‍युटिव्हमध्ये झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, मनोज घोरपडे, सौ. कविता कचरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. भाग्यश्री मोहिते, पंचायत समिती सदस्या सौ. विजया गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सौ. माने-कदम म्हणाल्या, आज संपूर्ण भारत भाजपमय झाला आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली असून थोड्याच दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मनोज घोरपडे यांचा शांत स्वभाव पाहता त्यांच्यासारखा आमदार कराड उत्तरला असावा, असे जनतेला वाटत आहे.
शेखर चरेगावकर म्हणाले, केंद्र सरकार व राज्य सरकारने चांगल्या योजना राबवून महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी जास्तीत जास्त काम केले आहे. सर्व महिलांनी मनोज घोरपडे यांचा प्रचार करावा.

मनोज घोरपडे म्हणाले, या मतदारसंघात 50 टक्‍के महिला मतदार आहेत; परंतु त्यांच्यापर्यंत जाऊन काम करता आले नाही. मात्र, आजपासून आपल्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावातील महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू सौ. कविता कचरे म्हणाल्या, कराड उत्तरमधील महिला पदाधिकाऱ्यांची ही पहिलीच बैठक होती. मनोजदादांच्या मागे महिलांची मोठी ताकद उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषद सदस्या सौ. मंगल घोरपडे, सौ. शशिकला जाधव, सौ. प्रभावती सूर्यवंशी, सौ. प्रतिभा कांबळे, सौ. रुक्‍मिणी जाधव, सौ. आशा घाडगे, सौ. वैशाली घोरपडे, सौ. मीनाक्षी क्षीरसागर, सौ. शहा, सौ. भोसेकर उपस्थित होत्या. सौ. तेजस्विनी घोरपडे यांनी प्रास्तविक केले तर सौ. राखी पवार यांनी आभार मानले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.