आता थेट विधानसभेत दोन क्रिकेटपटू भिडणार

कोलकाता  – क्रिकेटपटूंमधली लढत आपण मैदानात नेहमीच बघतो; पण आता हीच लढत पश्‍चिम बंगाल विधानसभेतही पाहायला मिळणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दोन क्रिकेटपटूंनी मैदान मारले आहे. 

हे दोन्ही क्रिकेटपटू भारताकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मनोज तिवारी हा तृणमूल कॉंग्रेसच्या, तर अशोक डिंडा हा भाजपच्या तिकिटावर विजयी झाला आहे. या दोघांनी विधानसभा निवडणुकीच्या काही काळ आधी राजकारणात प्रवेश केला होता.

35 वर्षांच्या मनोज तिवारीने शिवपूर मतदारसंघातून विजय मिळवला. त्याने भाजप उमेदवार रतिन चक्रवर्ती यांचा 32 हजार 603 मतांनी पराभव केला. गतवर्षी करोना काळात लॉकडाऊनमध्ये आपण प्रवासी मजुरांची अवस्था बघितली. यानंतर क्रिकेट सोडून राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया मनोज तिवारीने दिली.

37 वर्षांच्या अशोक डिंडाने मोईना विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. डिंडाने तृणमूलचे संग्राम कुमार दोलाई यांचा 1,260 मतांनी पराभव केला. संग्राम कुमार यांनी मागची विधानसभा निवडणूक 12 हजारांपेक्षा जास्त मतांनी जिंकली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.