मुंबई – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते ‘मनोज जोशी’ यांनी डिजिटल माध्यमात एंट्री केली आहे.
नुकतीच मनोज जोशी यांची ‘फादर्स व्हॉल्यूम २’ ही पहिली वेबसीरिज प्रदर्शित झाली असून, श्रीवास्तव नामक वडिलांची मुख्य भूमिका त्यांनी साकारली आहे.
कोणत्याही वयोगटातील व्यक्ती ही सीरिज पाहू शकतो. तसेच राकेश बेदी व वीरेंद्र सक्सेना हे देखील या सिरीज मध्ये मुख्य भूमिकेत आहेत.