Manoj Jarange SIT Inquiry । आज विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. तसेच आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी त्यांची मागणी मान्य करत चौकशीचे आदेश दिलेत. या आदेशावर आता मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
देवेंद्र फडणवीस शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवताय Manoj Jarange SIT Inquiry ।
भाजप नेते आशिष शेलार यांच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, यावर मनोज जरांगे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. “देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. मी कुठेच चुकीचं नाही आणि कुठेच गुंतू शकत नाही. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून, फोन कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
पुढे बोलतांना मनोज जरांगे यांनी,“मी मराठ्यांचे काम करतोय. ते सत्तेचा वापर करणार आहे. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. न्यायचं त्या तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत. आता म्हणाले तर मी सलाईन उचलून चौकशीला येतो, असे जरांगे म्हणाले आहेत.
कर नाही त्याला डर कशाला Manoj Jarange SIT Inquiry ।
तसेच कर नाही त्याला डर कशाला अशी भूमिका आपली आहे असे जरांगे यांनी म्हटले. त्यासोबतच चौकशी करायची असेल तर सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. तसेच आता आपण उघडपणे सर्व काही सांगणार असल्याचा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला.