Manoj Jarange Patil | Devendra Fadnavis : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरुच आहे. मध्यंतरी मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत त्यांनी आरक्षणाच्या अनुषंगाने सभा घेतल्या होत्या. आता जरांगे सध्या गावोगाव जाऊन मराठा बांधवांशी संवाद साधताहेतआता त्यांनी ग्रामीण भागाचा दौरा सुरु केला असून, । Manoj Jarange Patil
नुकतंच अहमदनगरच्या पारनेरमध्ये मराठा संवाद सभा पार पडली. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं.
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, “आमच्या विरोधात कोणी गेले तर त्याचा सुफडा साफ करत असतो. तो जामनेरचा म्हणतो माझे खूप लाड केले. काय लाड केले? फडवणीस साहेबाला मी सहा महिन्यांपासून बोललो नाही. । Manoj Jarange Patil | Devendra Fadnavis
काय करताल जेलमध्ये टाकताल? तर जेल मध्ये आंदोलन करेल, कैद्यांना आरक्षण समजूल सांगेल. भुजबळ कुठे गेले काय माहिता… हिमालयात गेले काय? आता मराठ्याबद्दल बोलला तर सुट्टी नाही, असं म्हणत जरांगेंनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलंय.
आंदोलन आता शेवटच्या टप्प्यात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी मला शत्रू मानायला सुरुवात केली आहे. तुम्हाला माहितीये मी मॅनेज होत नाही. त्यांचे एकच स्वप्न आहे याला बाजूला काढा… पण मला अटक करायला आणि न्यायला हिंमत लागते. माझी एसआयटी लावली माझ्याकडे आहे काय? गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शहाणे व्हावे.
मला माहिती मिळाली. गृहमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत. ते जेसीबीवर गुन्हे दाखल करत आहेत. मुंबई गेलो तेव्हाचे आता गुन्हे दाखल करत आहेत. या राज्यात भावनिक लाट येणार आहे आणि तुमचा सुफडा साफ होणार आहे.’ असं देखील जरांगे यावेळी म्हणाले.
सभेतील जेसीबीवर देखील कारवाई – Manoj Jarange Patil | Devendra Fadnavis
बीडमध्ये मनोज जरांगे पाटील हे दौऱ्यावर आले असताना त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. याकरिता जेसीबी आणि क्रेनचा वापर करण्यात आला होता. यामुळे बीड पोलिसांनी या जेसीबी व क्रेन चालकाविरोधात दंडात्मक कारवाई करत दंड ठोटावला असून आता यापूर्वी बीडमध्ये झालेल्या इशारा सभेमध्ये वापरण्यात आलेल्या जेसीबीची देखील माहिती घेतली आहे.