Manoj jarange on Farmer । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे ते निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता त्यांनी आपण राज्यातील बळीराजाची लढा देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आपण लढा उभारणार असल्याची घोषणा करत, मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचे म्हटले आहे.
मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाविषयी आज पत्रकार परिषद घेतली. याविषयी बोलताना,”आता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी आंदोलन करणार असून राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात याच अनुषंगाने बैठका घेणार असल्याचंही त्यानी जाहीर केलं. मतदार संघानिहाय बैठकांमध्ये मराठा आरक्षणासह शेतकरीआणि इतर सर्वच मुद्दे घेण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ‘लवकरच शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार असून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे.’ शेतकऱ्याची कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे राहिले आहेत, सरकार प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना फसवते, आता सरकार कसे कर्जमाफी करत नाहीत हे पाहतो,” असेही जरांगे यांनी म्हटले.
5 सप्टेंबरपासून घोंगडी बैठका Manoj jarange on Farmer ।
निवडणुका आल्या की साड्या वाटतात, आताही यांचं तसंच सुरु झालं आहे. सगळे मुद्दे आम्ही ताकतीने लावून धरणार आहोत. त्यासाठी, 5 सप्टेंबर पासून विधानसभा मतदारसंघानिहाय घोंगडी बैठका होणार असल्याची घोषणाही मनोज जरांगे यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली भेट Manoj jarange on Farmer ।
मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सध्या नेतेमंडळी आणि आमदार, खासदारांच्या रांगा लागल्या आहेत. नुकतेच, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही मनोज जरांगे यांनी अंतरवालीत जाऊन भेट घेतली. मी केवळ त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो, अस जरांगे यांनी म्हटले.
त्यासोबतच “महाराष्ट्रातील 700 ते 800 इच्छुक उमेदवारांनी माझी भेट घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. उमेदवारांचं फार भयाण काम आहे. उमेदवार पाहिले की वाटतं कुठून या लफड्यात पडलो. मरणाचे उमेदवार आहेत. माझ्याकडे 700 ते 800 लोक आले. आम्हाला वाटतं होतं की मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज येतील, पण सर्वात जास्त अर्ज पश्चिम महाराष्ट्रातून आले आहेत. त्यानंतर नंबर 2 ला मराठवाड्यातून आले. आम्ही त्यासाठी लोक बसवलेत. मला त्यातील जास्त काही जमत नाही”, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलंय.