मनोज दुलम यांची निवड म्हणजे त्यांच्या कामाची पावती : श्रीनिवास बोज्जा

सभागृह नेते दुलम यांचा फटाका असोसिएशनच्या वतीने सत्कार
नगर (प्रतिनिधी) –
चांगले काम केले की त्याचे फळ मिळते, त्या प्रमाणेच मनोज दुलम यांच्या कामाची नोंद घेऊन एका सामान्य कार्यकर्त्यास सभागृह पदी निवड केलीही भूषणावह गोष्ट आहे, असे प्रतिपादन फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केले.

महानगरपालिकेच्या सभागृह नेते पदी नगरसेवक मनोज दुलम यांची निवड झाल्याबद्दल दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशन चे सचिव संतोष बोरा, सहसचिव अरविंद साठे, उपाध्यक्ष सोमा रोकडे, कार्याध्यक्ष सुरेश जाधव, अनिल टकले, संतोष वल्ली, कैलास खरपुडे, सुनील गांधी, अमोल तोडकर, गणेश परभाने, विकास पटवेकर, दाजी गारकर, संजय सुराणा, शिवराम भगत, उमेश क्षीरसागर उपस्थित होते.

यावेळी दुलम म्हणाले, फटाका असोसिएशन जो माझा सत्कार केला हा माझा घरगुती सत्कार असून, मी माझ्या पदाचा वापर व्यापारी वर्गाना मदत होण्यासाठी नक्की करेल. नगर शहरात व्यापारी वर्ग हा कमी होत असून, व्यापारी वाढण्यासाठी मी अहमदनगर महानगरपालिका माध्यमातून नक्कीच सहकार्य करणार आहे असे आश्‍वसन दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.