लॉकडाउनच्या काळात बहुतांश सेलिब्रिटी आपल्या घरातच बस्तान मांडून आहेत. कोणी पदार्थ तयार करत आहे तर कोणी वर्कआऊटचे व्हिडिओ शेअर करत आहेत. अशा स्थितीत अभिनेता मनोज वाजपेयी मात्र उत्तराखंडमध्ये अडकला आहे. मनोज वाजपेयी हा उत्तराखंडच्या ग्रामीण भागात अडकला असून तेथे टिव्ही नाही आणि मोबाइलला नेटवर्क देखील नाही. ते उत्तराखंडच्या जंगल क्षेत्रात दीपक डोबरियालसमवेत शूटिंग करत होते.
केवळ चार दिवसाची शूटिंग झाल्यानंतर लॉकडाउनची घोषणा झाली. गेल्या तीन आठवड्यापासून मनोज वाजपेयी आणि दीपक डोबरियाल हे उत्तराखंडमध्ये आहेत. आता तीन मे पर्यंत लॉकडाउन वाढले आहे. परंतु त्याची पत्नी शबाना आणि मुलगी त्याच्यासमवेत आहेत, ही चांगली बाब आहे. परंतु दीपकचे कुटुंब मुंबईतच आहे.