बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेता मनोज वाजपेयी मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी आपला 50वा वाढदिवस साजरी करणार आहेत. यासोबतच बॉलीवूडमध्येही 25 वर्षे पूर्ण होत आहे. तसेच यंदाच्या वर्षी त्यांना “पद्मश्री’ जाहीर झाल्याने त्यांची पत्नी शबाना उर्फ नेहा एक जंग्गी पार्टी देवून “बर्थ डे’ सेलिब्रेशन करणार आहे.
मनोज वाजपेयी याने 1994मध्ये गोविंद निहलानी यांच्या “द्रोहकाल’ या चित्रपटात एक छोटी भूमिका साकारत बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर शेखर कपूर यांच्या सुपरहिट “बॅडिट क्वीन’ चित्रपटात मान सिंह याची भूमिका साकारली होती. राम गोपाल वर्मा यांच्या “सत्या’ चित्रपटात भीखू म्हात्रेची भूमिका साकारल्यानंतर त्यांनी मागे वळूनच पाहिले आहे. त्यानंतर बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत आहेत.
दरम्यान, चित्रपटसृष्टीत त्यांनी दिर्घकाळ काम केले आहे. वाजपेयी यांच्या मते, चित्रपटांच्या संख्येपेक्षा या इंडस्ट्रीत टिकून राहणे खूप महत्त्वाचे आहे. मनोज वाजपेयी त्यांचा वाढदिवस खास व्यक्तिंसोबत सेलिब्रेट करू इच्छित आहे.