खंडणी प्रकरणात अखेर मनोज अडसूळ जेरबंद

न्यायालयाने सुनावली 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी : गुन्ह्यातील पाच लाख रुपये जप्त

पुणे: पुण्यातील एका डॉक्‍टरकडून 75 लाख रूपयांची खंडणी उकळणाऱ्याला अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाने मुंबइतील घाटकोपर परिसरातून अटक केली आहे. त्याला पाच मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस. जोंधळे यांनी दिला आहे. दरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यातील पाच लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

मनोज तुकराम अडसुळ उर्फ अत्रे (वय 48,रा. सॅलिसबरी पार्क ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी डॉ.दिपक प्रभाकर रासने (वय 69, पर्वती) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 18 ऑक्‍टोबर 2019 ते 6 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडली. याप्रकरणी 9 फेब्रुवारीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने अडसुळ याचा अटकपूर्व नुकताच फेटाळला होता. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.

त्यांना अडसुळ हा त्यांच्या घाटकोपरमधील एका मित्राच्या घरी राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ही कारवाई करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला पोलीस कोठडी देण्याची सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. तर, बचाव पक्षातर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली.

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. या गुन्हयात त्याला कोणी मदत केली आहे का? त्याचे साथीदार कोण आहेत, गुन्ह्यातील पाच लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित 70 लाखांचा शोध घ्यायचा आहे. त्याने त्याच्या एका खात्यातून तब्बल 54 लाख रुपये आरटीजीएस केले आहेत. ते पैसे कुठले आहेत. कोणाला आणि का पाठविण्यात आले.

ज्या महिलेच्या नावे खंडणी मागितली. त्या महिलेचा आरोपीचा संपर्क गुन्ह्याआधी आणि गुन्ह्यानंतर किती वेळा झाला. जयेश कासट हे मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. कासट आणि आरोपीमध्ये काय चर्चा झाली, याचा शोध घेणे आवश्‍यक आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, मुंबई येथे जावून तपास करावा लागणार असल्याने त्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी ऍड. विजयसिह जाधव यांनी केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.