मनोहर पर्रीकर अधिवेशनाला उपस्थित राहणार

पणजी – गोवा विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन 29 जानेवारी रोजी सुरू होणार असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे संपूर्ण अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री पर्रीकर हे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथेप्रमाणे सभागृहाला संबोधित करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाच्या आजारावरील उपचारासाठी गेल्या वर्षी गोवा, मुंबई, दिल्ली तसेच अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर ते पणजी येथील खासगी निवासस्थानी आराम करत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातही त्यांनी अपवादानेच हजेरी लावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)