#Video : बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या मनोहर भोसलेचा पर्दाफाश

बारामती पोलिसांनी घेतले ताब्यात......

बारामती :- श्री बाळू मामांचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील एक जणांचा कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत 2 लाख 50 हजारांची फसवणूक  केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले याच्यांसह तिघांवर फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ-अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. 

त्यानंतर मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याला बारामती पोलीस आणि पुणे एलसीबीने अटक केली आहे. मनोहर भोसले याला सातारा जिल्ह्यातील ‌सालपे गावातील एका फार्महाऊस वरुन ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसले याला ताब्यात घेतले असल्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.