मनोहर जोशी-नितिन गडकरी यांची सदिच्छा भेट

नागपूर: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली आहे. जोशी नागपूरमध्ये जाहीर व्याख्यानासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

या भेटीदरम्यान जोशी आणि गडकरी या दिग्गज नेत्यांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. सेना भाजपा यांची युती झाली हे राज्याच्या हिताचे झाले आहे. आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित काम करायला हवे, अशी अपेक्षा जोशी व गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. 2014मध्ये शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. आता 2019च्या निवडणुकीत दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र रिंगणात उतरले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात 1996मध्ये सत्तेत आलेल्या युतीच्या सरकारमध्ये जोशी मुख्यमंत्री, तर नितीन गडकरी यांना सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. यावेळी जोशी यांनी गडकरी यांच्यावर विश्वास टाकला होता, व त्याच कारकिदीर्ने गडकरी यांना एक गतिमान मंत्री ही ओळख दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)