‘मनोदय’ : केवळ क्‍लिनिक नव्हे तर एक कुटुंब

कृष्णेकाठी वसलेल्या आणि धार्मिक पार्श्‍वभूमी लाभलेल्या मर्ढे या छोट्याशा खेडेगावात जन्म झाला. पण, वडिलांच्या नोकरीमुळे संपूर्ण बालपण पुणे आणि नगर जिल्ह्यातील गामीण भागात घालवावे लागले. वडील शाळेवर कर्मचारी, आई गृहिणी आणि दोन बहिणी सोबत वडील काम करत असलेल्याच शाळेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.जन्मगावाचे वास्तव्य न लाभल्याने संपुर्ण शालेय जीवनात गावाची आणि सातारा जिल्ह्याची ओढ कायम असायची.

अभ्यासातील गती आणि आजुबाजुचे शैक्षणिक वातावरण यामुळे वयाच्या 14 व्या वर्षीच डॉक्‍टर बनुन पुढील आयुष्यात सातारा जिल्ह्याची सेवा करायची अशी मनाशी खुणगाठ बांधून जिद्दीने अभ्यासाला लागलो. दहावी, बारावीमध्ये प्राविण्य मिळवत पहिल्याच वैद्यकिय प्रवेश परीक्षेत मेरिटमध्ये येत एमबीबीएसला प्रवेश मिळविला. मुलाच्या जिद्दीला वडिलांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरेपुर पाठिंबा दिला. त्यामुळे प्रथम एमबीबीएस केले नंतर डिपीएम शिक्षण पूर्ण करुन जिल्हा रुग्णालयात मनोविकार तज्ञ म्हणून कामास सुरुवात केली. जिल्हा रुग्णालयात मनोविकारग्रस्त रुग्ण पाहताना आलेले अनुभव आणि जिल्ह्यातील रूग्णांची दर्जेदार औषधोपचारांची गरज लक्षात घेवून, सातारकरांना मनोआरोग्य सुविधा देण्यासाठी डिसेंबर 2014 च्या अखेरीस साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाणी पोवई नाक्‍याजवळच सिव्हिल रोड, रामकृष्ण कॉलनी येथे मनोदय क्‍लिनिक आणि चाईल्ड गाईडन्स सेंटर चालू केले.

मानसिक आजार, त्याविषयीची जनजागृती, आणि गरजू रुग्णांना व त्यांच्या नातलगांना योग्य मार्गदर्शन व उपचार हा उद्देश समोर ठेवून गेली 5 वर्ष मनोदय कार्यरत आहे. गेल्या चार वर्षांच्या वाटचालीत मनोदय हे केवळ एक क्‍लिनिक न रहाता डॉक्‍टर, सहकारी, आणि रुग्ण मित्रांचे एक कुटुंब बनले आहे. या मनोदयात सर्व सहकारी एक विचाराने, एक ध्येयाने कार्यरत असतात. आलेल्या रुग्णांशी एक आपुलकीचे नाते जोड़तात आणि ते कर्तव्यनिष्ठेने जोपासतात.

रुग्णसेवाच केंद्रस्थानी मानुन, येणाऱ्या रुग्णाचा त्रास समजावून घेत त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना आधार देत त्यांची आवश्‍यक ती पूर्ण माहिती घेतली जाते. रूग्णाला होणारा त्रास त्याचा पुर्वइतिहास आणि त्याची त्यावेळची स्थिती पाहुन उपचारांची आखणी केली जाते आणि त्याविषयी एज्युकेट केले जाते. या संपूर्ण कामात मनोदयातील प्रत्येकजण सहभागी असतो.

मनोदय क्‍लिनिकचे भाग्य चांगले की ही संपुर्ण टिम मानसिक आरोग्य समजावून घेवून त्याच्या जोपासनेसाठीच कार्यरत असते. योगेशसारखा सहहृदयी सहकारी रूग्णांना त्यांच्या आजाराविषयी योग्य माहिती समजावून सांगतो. रिसेप्शनवरील दोघी रिसेप्शनीस्ट येणाऱ्या रुग्णांशी आपुलकीने चौकशी करतात. त्यांना आधार देतात. त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. एकूण ही सर्व टिम एक कुटुंबाप्रमाणे मनोदयातील वातावरण एकसंध ठेवतो. त्यामुळे येणारी व्यक्ती समाधानाने उपचारामध्ये सातत्य दाखवत आपल्या आजारावर यशस्वीपणे मात करू शकते. आणि मनोदय कुटुंबाचा भाग बनून जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.