नवी दिल्ली – स्वावलंबी भारत हीच आजवरची आमच्या सरकारची प्राथमिकता राहिली असून सर्वच क्षेत्रात स्वावलंबी होणे, हे आता आमच्या अंगवळणी पडू लागले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातच्या ११५ व्या भागात सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारतावर भर दिला. त्यांनी सरदार पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांचेही स्मरण केले. मोदी म्हणाले की, या दोन्ही महापुरुषांनी वेगवेगळ्या आव्हानांचा सामना केला, पण त्यांची दृष्टी एकच होती, ‘देशाची एकता’.
Aatmanirbhar Bharat Abhiyan is becoming a people’s campaign. #MannKiBaat pic.twitter.com/Yh8DJtsDFC
— PMO India (@PMOIndia) October 27, 2024
मोदी पुढे म्हणाले की, स्वावलंबन हे आमचे धोरणच नाही तर आमची आवडही बनली आहे. काही वर्षांपूर्वी नाही, फक्त 10 वर्षांपूर्वी भारतात काही क्लिष्ट तंत्रज्ञान विकसित होत आहे असे कोणी म्हटल्यावर अनेकांचा त्यावर विश्वास बसणार नाही आणि अनेकांची खिल्ली उडवायची. पण आज तेच लोक देशाचे यश पाहून थक्क होतात. स्वावलंबी होत असलेला भारत प्रत्येक क्षेत्रात आश्चर्यकारक कामगिरी करत आहे.
मोदी म्हणाले की, या सणासुदीच्या काळात व्होकल फॉर लोकल या मंत्राने आम्ही आमची शॉपिंग करतो. हा नवा भारत आहे जिथे मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड बनला आहे. आपल्याला केवळ भारताला स्वावलंबी बनवायचे नाही तर आपल्या देशाला नवनिर्मितीचे जागतिक पॉवरहाऊस म्हणून स्थापित करायचे आहे.
एनिमेशननध्ये क्रांती घडवणार
छोटा भीमप्रमाणेच आमची दुसरी एनिमेटेड मालिका कृष्णा, मोटू-पतलू, बाल हनुमान यांचेही जगभरात चाहते आहेत. भारतीय एनिमेशन पात्रे आणि चित्रपट त्यांच्या सामग्री आणि सर्जनशीलतेमुळे जगभरात पसंत केले जात आहेत. एनिमेशनच्या क्षेत्रात भारत जगामध्ये क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहे. भारतातील गेमिंग स्पेसही वेगाने वाढत आहे. भारतीय खेळही जगभर प्रसिद्ध होत आहेत.
The gaming space of India is also expanding rapidly. These days, Indian games are also gaining popularity all over the world. #MannKiBaat pic.twitter.com/Xl9i4AQwHG
— PMO India (@PMOIndia) October 27, 2024
सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण
नरेंद्र मोदी म्हणाले की, डिजिटल अटकेच्या बळींमध्ये प्रत्येक वर्ग आणि वयोगटातील लोकांचा समावेश आहे. भीतीमुळे लोकांनी कष्टाने कमावलेले लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कधी असा फोन आला तर घाबरू नका. तुम्हाला हे माहित असले पाहिजे की कोणतीही तपास यंत्रणा कधीही फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉलवर अशी चौकशी करत नाही.
हॅन्ली टेलिस्कोप विषयी…
आता आत्मनिर्भर भारत अभियान एक जनआंदोलन बनत आहे. या महिन्यात आम्ही आशियातील सर्वात मोठ्या ‘इमेजिंग टेलिस्कोप एमएएसईचे हानले, लडाख येथे उद्घाटन केले. हे 4300 मीटर उंचीवर वसलेले आहे. ज्या ठिकाणी -30 अंश एवढी थंडी आहे, जिथे ऑक्सिजनचीही कमतरता आहे, तिथे आपल्या शास्त्रज्ञांनी आणि स्थानिक उद्योगांनी जे केले आहे ते आशियातील इतर कोणत्याही देशाने केले नाही. हॅन्ली टेलिस्कोप दूरच्या जगाकडे पाहत असेल, पण ती आपल्याला स्वावलंबी भारताची ताकदही दाखवत आहे. आपण सर्वजण आत्मनिर्भर भारताच्या या मोहिमेला बळकट करू.