मनमोहन सिंग यांची करोना चाचणी; ‘हा’ आला रिपोर्ट

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मनमोहन सिंग यांची करोना चाचणी घेण्यात आली आहे. त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आला आहे.

नवीन औषधांच्या सेवनामुळे त्यांना रिऍक्‍शन आली. तसेच त्यांना तापही आल्याचे सूत्रांनी सांगितले. हा ताप येण्यामागे औषधाची रिऍक्‍शन हे कारण आहे का अन्य काही कारण आहे, हे तपासण्यासाठी काही चाचण्या केल्या जात आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व निकष अपेक्षित असेच आहेत.

दरम्यान,  २००९ मध्ये मनमोहन सिंग यांच्यावर एम्समध्येच कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.