नवी दिल्ली: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करणार असल्याचे म्हटले आहे. मनमोहन सिंग शीख समुदायाकडून येत असल्यामुळे आम्ही त्यांना औपचारिक आमंत्रण पाठवणार असल्याचे कुरेशी म्हणाले.
दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे पाकिस्तानचे आमंत्रण स्वीकारणार नसल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने अशी माहिती दिली आहे.
Congress Sources: Former Prime Minister Manmohan Singh will not accept Pakistan’s invitation to the opening of #KartarpurCorridor (File pic) pic.twitter.com/ZYRodq5GPK
— ANI (@ANI) September 30, 2019