मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना सुनावले खडे बोल

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवाहरलाल नेहरू मेमोरियल कॉम्प्लेक्स भोवती उठलेल्या वादाबाबत तीव्र निषेध व्यक्त करणारे  शुक्रवारी पत्र लिहले. त्यात त्यांनी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू मेमोरियल कॉम्प्लेक्सचा इतिहास आणि त्याचा वारसा लक्षात घेता ते ठिकाण शांततेत राहू देण्याचे बजावले आहे.

भारत सरकारचे जवाहरलाल नेहरू मेमोरियल कॉम्प्लेक्सबाबत नवीन नियोजन आखले आहे.  त्यात तीन मूर्ती कॉम्प्लेक्स मधील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी ( एनएमएमएल ) येथे भारताच्या सर्व पंतप्रधानासाठीच्या आठवणी जतन करण्याचे नियोजन आहे. त्याला  दोन वेळा भारताचे पंतप्रधान राहीलेल्या डॉ. मनमोहन सिंह यांनी विरोध दर्शविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पत्रात अटल  बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान कार्यकाळाचा दाखला देत डॉ. मनमोहन सिंग म्हणाले,  त्यांच्या काळात एनएमएमएलच्या स्वरूपात आणि रचनेत कोणताही बदल करण्याचा त्यांचा निर्णय नव्हता. परंतु सद्याच्या सरकारचे हे धोरणच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)