मानकुमरे यांना धमकी देणाऱ्यांचा छडा लावावा ः आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे जावळी तालुक्‍यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. अशा प्रतिष्ठीत व्यक्‍तीला आणि त्यांच्या मुलाला धमक्‍यांचे फोन येणे ही चिंताजनक बाब आहे. या सर्वाच्या पाठीमागे कोण आहे याचा छडा पोलीस प्रशासनाने लावावा. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन पोलिसांनी तातडीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

जावळी तालुक्‍यात सध्या एक ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली असून त्यामध्ये मानकुमरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. मोरघर खिंड येथील दगडखाणीचाही उल्लेख त्यामध्ये आहे. पोलिस प्रशासनाने याची चौकशी करण्याची मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. वसंतराव मानकुमरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. अशा लोकांना उघड धमकी देण्याचे प्रकार घडत असतील तर तालुक्‍यात कायदा व सुव्यवस्था आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पोलीसांनी संबंधीतांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करतानाच मी आणि संपूर्ण जावळी तालुका मानकुमरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.