Tumbadchi Manjula Trailer : भयपटात कॉमेडीची झलक पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांमध्ये अशा चित्रपटाबद्दल एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळते. स्त्री या हिंदी चित्रपटानंतर आता अनेक भयपटांमध्ये कॅामेडीचा सुयोग्य मेळ घातल्याचे बघायला मिळत आहे. मराठी चित्रपटांमध्ये देखील याचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या चित्रपटाची चर्चा होती, अखेर त्या ‘तुंबाडची मुंजळा’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Tumbadchi Manjula Trailer) ट्रेलरची सुरुवात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या आवाजाने होते. त्याच चित्रपटातील पात्रांची ओळख करून देतात. या चित्रपटाच्या कथेचा गाभा एका गावाभोवती फिरतो. गावात एका रहस्यमय तरुणीच्या आगमनानंतर विचित्र आणि भयानक घटना एकमागूनएक घडू लागतात. (Tumbadchi Manjula Trailer) तिला गावातील लोकं “मंजुळा” या नावाने हाक मारताना दिसतात. नेमकी कोण आहे ही मंजुळा आणि तिचा गावाशी काय संबंध आहे, याभोवती चित्रपटाचं रहस्य गुंफलेलं आहे. या चित्रपटाची कथा कोकणातील असल्याने तिथल्याच भाषेचा वापर संवादात करण्यात आला आहे. हॉररसोबत विनोदाची फोडणी असल्यामुळे एक वेगळाच अनुभव देणारा तुंबाडची मुंजळा हा चित्रपट असणार असल्याचे बोलले जात आहे. (Tumbadchi Manjula Trailer) ग्रामीण वातावरण, रहस्य, अंधश्रद्धा आणि विनोदी याचा अनोखा मिलाफ चित्रपटात करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर भेटीला आल्यानंतर मोठी उत्सुकता ट्रेलरविषयी होती. ट्रेलर देखील उत्कंठावर्धक आहे. विशेष म्हणजे “तर्राट” हे चित्रपटातील गाणं सोशल मीडियावर चर्चेत आलं असून विशाल दादलानी यांच्या आवाजामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Tumbadchi Manjula Trailer) हा चित्रपट ५ जून २०२६ रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेते मंकरद अनासपुरे एका मांत्रिकाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विविद कोरगावकर यांनी केले असून, जितेंद्र जोशी, ओम भुतकर, सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत आहेत. तर इतर अनेक कलाकार चित्रपटात विविध भूमिका साकारताना बघायला मिळणार आहे. हेही वाचा : New Home: मराठमोळ्या अभिनेत्याचे तिसरं घर! व्हिडिओ शेअर करत दाखवली झलक