करोनाबाधित महिलेमुळे मांजरवाडी सील

खोडद -मांजरवाडी (ता. जुन्नर) येथे विवाहित महिला करोनाबाधित आढल्यामुळे संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे व खबरदारी म्हणून हे गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. त्याचबरोबर खोडद आणि हिवरे ही दोन गावेही बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

त्याचबरोबर पाच किलोमीटर अंतरावरील परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला या झोनमध्ये हिवरे तर्फे नारायणगाव व खोडद या गावांचा समावेश करण्यात आला आहे. तरी सर्व नागरिकांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, म्हणजे सर्व कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्याना काम करणे सोपे जाईल. करोनाच्या परिस्थितीत नागरिकांनी जागरूक राहावे, असे सरपंच सूर्यकांत थोरात यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र वारूळवाडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ म्हणाल्या, बाहेरगावावरून आपल्या गावात व वाडीवस्त्यामध्ये कोणी आले असल्यास त्यांची माहिती प्रशासनाला तत्काळ द्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.