मांजरी : कोरोनाच्या कठीण प्रसंगात रुग्णांना दिवसेंदिवस रक्ताची गरज भासत आहे.या कठीण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या आदेशानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मांजरी बुद्रुक येथे कै. अजिंक्यदादा घुले यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व शारदा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अजित दत्तात्रय घुले यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस अध्यक्षमेहबूबभाई शेख व महाराष्ट्र प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.या शिबिरात एकूण 189 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या शिबिराला नोबेल हॉस्पिटल ब्लड बँक व पी एस आय ब्लड बँकांनी मदत केली.प्रत्येक रक्तदात्याला मास्क सॅनिटाईजर तसेच वाफेचे मशीन व प्रमाणपत्र देण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार चेतन तुपे पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी खलसे, जितीन कांबळे, दिलीप टकले, सचिन टकले, विक्रम शेवाळे,अभिषेक घुले, अनिल घुले, विनय घुले, गजेंद्र मोरे,प्रकाश जावळे,संजय गायकवाड, माणिक शेट्टी, प्रशांत भंडारी, चंदु सुराले, प्रकाश शिंदे, माउली मोरे, तुषार घुले, संतोष घुले, अविनाश गुंडाले, मंगेश जगताप, शैलेश बडदे, मेघराज घाडगे, सिद्धांत घुले सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
मांजरी गाव व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन सामजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.आज या महामारीच्या काळात रक्ताची खूप मोठी गरज आहे.आणि त्यासाठी आपण काहीतरी खारीचा वाटा उचलू शकतो याच भावनेतून रक्तदान शिबिर घेतले त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला , भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेण्याचा मानस आहे.
अजित घुले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस