Manisha Havaldar : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून प्राध्यापिका मनिषा हवालदारला सीबीआयने अटक केल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिने पुरावा मागे राहून नये म्हणून पुरेपूर प्लॅनिंग केले होते. मात्र, सीबीआयच्या चौकशीत तिच्या भूमिकेबाबत मोठा उलघडा झाला आहे. तपासात मनीषा हवालदार हिने नीटचे प्रश्न विकले असल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता सीबीआयच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यात मोठी कारवाई करत सीबीआयने मनिषा मांढरे, ब्युटी पार्लर चालक मनिषा वाघमारे आणि पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक केली. त्यामुळे तपासाचा धागा आपल्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी मनीषा हवालदारने एक शक्कल लढवली. तिने फिजिक्स विषयाचे प्रश्नसंच असलेल्या काही ‘नोट्स चक्क जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सीबीआयच्या तपासात निषप्न झाले आहे. यामुळे तिच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत असून, पुण्यातील तीन मनिषा नावांच्या महिला आरोपांनी अटक केल्यानंतर यांच्यामध्ये काही कनेक्शन आहे का या दृष्टीनेही तपास केला जात आहे. मेसेज केले डिलीट बायोलॉजी विषयाची प्राध्यापिका मनिषा मांढरे सोबत केलेले चॅटिंग मनीषा हवालदार हिने डिलिट केले होते. दोघींमध्ये मेसेजद्वारे संवाद साधला जात होता. मनिषा हवालदारने पतीच्या फोनवरून सुद्धा काही प्रश्नसंच मनिषा मांढरेला पाठवले असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा तपास कोणापर्यंत जाणार आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवालदार यांच्या घराची झाडाझडती सीबीआयने मनिषा हवालदार यांच्या पुण्यातील सदाशिव पेठेतील घराची झाडाझडती घेतली आहे. अधिकाऱ्यांना भौतिकशास्त्र विषयाचे २३ पानांचे हस्तलिखित प्रश्न सापडले. ‘नीट’च्या विविध प्रकारच्या मूळ प्रश्नपत्रिकाही हाती लागल्या आहेत. धक्कादायक म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीची (NTA) अनेक अधिकृत प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रांच्या प्रती तसंच घरात लपवून ठेवलेली १ लाख १ हजार ९३० रुपयांची रोख रक्कम आढळली आहे. ज्यापैकी ६० हजार रुपये सीबीआयने जप्त केले. हेही वाचा : Donald Trump: अमेरिका पुन्हा एकदा हादरली ! व्हाइट हाऊसजवळ गोळीबार ; ट्रम्प थोडक्यात बचावले