Manish Sisodia defeated । दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. त्यात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. त्यात सत्ताधारी आपचे नेते पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. त्यातच आपला आता मोठा धक्का बसणारी बातमी समोर येत आहे. आपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यामंत्री मनीष यांचा परभव झाला आहे.
आम आदमी पक्षाचे उमेदवार मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी ही जागा 1844 मतांनी जिंकली आहे. मनीष सिसोदिया यांचा केवळ ६०० मतांनी पराभव झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.०
दरम्यान , दिल्लीत तब्बल 13 वर्षांपासून आम आदमी पक्षाची (AAP) एकहाती सत्ता आहे. यंदा अँटी इन्कबन्सी फॅक्टरच्या जोडीला भाजपने लावलेली प्रचंड ताकद ‘आप’ची (AAP) सत्ता उलथवून लावेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी (Exit Polls 2025) व्यक्त केला आहे. पहिल्या कलांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.
हेही वाचा
‘… म्हणूनच दिल्लीत केजरीवालांचा पराभव झाला’, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सांगितले कारण