इम्फाळ – मणीपूरच्या लुनग्लेई नामक अतिशय लहानशा गावातीएल एका चार वर्षांच्या चिमुरडीने सादर केलेल्या, विख्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या “मॉं तुझे सलाम’ या देशभक्तीपर व्हिडीओने नेटीझन्समध्ये सध्या मोठी चर्चा असून, तिच्या या व्हिडीओने पंतप्रधान नरेंद्र मोदी, खुद्द ए. आर. रेहमान, मणीपूरचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांच्यासह लक्षावधी नेटीझन्सना भुरळ पाडली आहे.
या चिमुरडीचे नाव एस्थर नामते असे असून युट्युबवर या व्हिडीओला लक्षावधी व्ह्युज, लाईक्स आणि कॉमेन्ट्स मिळत आहेत.
एस्थरच्या या साधारण साडेतीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये ती, तिच्या शाळेतील विद्यार्थी आणि तिच्या घरातील सदस्य रेहमान यांचे “वंदे मातरम्’ अर्थात “मॉं तुझे सलाम’ हे गाणे सादर करताना दिसत आहेत.
एस्थरच्या चेहऱ्यावरील निरागस भाव, मणीपूरची समृद्ध भूमीचे दर्शन आणि टीपेला पोहोचूनही न चिरकणारा एस्थरचा आवाज, हे सारेच लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला नसेल, तर अवश्य पहा…