-->

देशाला तुझी गरज निवृत्तीचा विचार मनातून काढून टाक – लता मंगेशकर

नवी दिल्ली – विश्‍वचषक स्पर्धा 2019च्या पहिल्या उपान्त्य सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव झाल्यानंतर टीम इंडिया निराश झाली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा आता जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.


लता मंगेशकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’नमस्कार धोनी. मी ऐकलं की तू निवृत्ती घेण्याचा विचार करत आहेत. कृपया करून तसा विचारही करू नकोस. देशाला तुझी गरज आहे. त्यामुळे मी पुन्हा विनंती करते की निवृत्तीचा विचार मनातून काढून टाक.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.