माणिकराव गावित यांच्या पीएचा आत्महत्येचा प्रयत्न

नंदुरबार – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचे स्वीय सहाय्यक (PA) भगवानसिंग गिरासे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी वेळीच धाव घेत दोरी कापल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून नंदुरबारमधील शिंदे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

विशेष म्हणजे गिरासे दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर 1 एप्रिलला त्यांचा शोध लागला. मात्र त्यांचे डोक्‍यावरचे केस आणि मिशी कापलेल्या अवस्थेत ते घरी परतले. तेव्हापासून ते काहीसे तणावात होते.माणिकराव गावित यांचे निष्ठावान असलेले भगवान गिरासे यांनी आज (5 एप्रिल) सकाळी साडेदहाच्या सुमारास गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याचे कळते. त्यांनी हे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, तिकीटवाटपावरुन नाराज गावित यांची मनधरणी करण्यासाठी 30 मार्च रोजी मुंबईतील टिळक भवनात बैठक आयोजित केली होती. यावेळी माणिकराव गावितांसोबत भगवान गिरासेही उपस्थित होते. मात्र बैठकीनंतर भगवान गिरासे अचानक बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनंतर (1 एप्रिल) ते नंदुरबारमधील घरी परतले. परंतु त्यांच्या शारीरिक हालचाली ठीक नव्हत्या. ते कोणाशी बोलत नव्हते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.