फळांचा राजा “आंबा’

कोलेस्ट्रॉल कमी करतो

उन्हाळा सुरु झाल्याने बाजारात आंबे दिसायला सुरुवात झाली आहे. आंबे खायला सगळ्यांनाच आवडतं. आंब्याचं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. आंब्यात मोठ्या प्रमाणात बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन “अ’ असतं. आंब्यात व्हिटॅमिन सी, अ, आणि विविध प्रकारचे कॅरोटेनॉइड असतात. तसंच झिंक मोठया प्रमाणात असतं.

कोलेस्ट्रॉल कमी करतो
आंब्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात. आंब्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत मिळते.

रक्‍ताची कमतरता दूर होते
आंब्यामध्ये आयर्न असते. आहारामध्ये आंब्याचा समावेश केल्यास आयर्नची कमतरता भरून निघेल.

स्मरणशक्‍ती वाढते
आंब्यात व्हिटॅमिन “बी’ मोठया प्रमाणात असते. जे मेंदूच्या विकासासाठी गरजचे असतं.

दृष्टी सुधारते
आंब्यामुळे शरीराला व्हिटॅमिन अ, बीटा कॅरोटीन व अल्फा कॅरोटीन यांचा मुबलक पुरवठा होतो. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते व दृष्टी उत्तम राहते.

रोग प्रतिकारशक्‍ती वाढते
आंब्यामुळे शरीरातील नसा, टिशू व स्नायू मजबूत होतात. आंब्यात सुमारे 150 कॅलरीज असतात. त्यामुळे आंब्याच्या अधिक सेवनाने वजन वाढणायची शक्‍यता असते. जेवल्यानंतर आंबा खाल्याने कॅलरीजचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे सकाळी, संध्याकाळी नाश्‍ता म्हणून आंबा खाणे जास्त फायदेशीर ठरेल. अधिक प्रमाणात आंबा खाल्याने शरीरात उष्णता वाढते. आंबा खाण्यापूर्वी तो थोडा वेळ थंड पाण्यात भिजू द्यावा. आंबा कापून किंवा चोखून खावा.

डॉ.आदिती पानसंबळ,  आहारतज्ञ , संपर्क : 7385728886.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.