आंबा उत्पादनाला जिल्ह्यात फटका

चिंबळी -यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. मात्र मध्यंतरीच्या काळात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने फळबागांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.

दरवर्षी आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते; परंतु यावर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने आंब्याच्या झाडांचे मोहोर गळून गेले.

ग्रामीण भागात आंब्याचे फळ निघाले नसल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग यूथून आलेल्या आंब्यावरच लोकांना अवलंबून राहावे लागले. हे आंबे 550 ते 600 रुपये डझन भावाने विक्री जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×