आंबा महोत्सवही ‘ऑनलाइन’; उत्पादक ते ग्राहक थेट विक्री

बिबवेवाडी – महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा माल मिळावा, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर थेट आंबा उत्पादक व ग्राहकांची भेट घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि मंडळामार्फत ऑनलाइन सुविधा देण्यात येत आहे. याकरिता पणन मंडळाचे https://bs.msamb.com हे खरेदी-विक्रीकरीताचे ऑनलाइन पोर्टल कार्यरत करण्यात आले असून यावर आंबा उत्पादक तसेच ग्राहक नोंदणी करू शकतात. याद्वारे गृहनिर्माण संस्थेमधील जास्तीत जास्त सभासदांनी एकत्रित नोंदणी केल्यास कोकणातील आंबा उत्पादकांना थेट सोसायटीमध्ये दर्जेदार आंबा पुरविणे शक्‍य होणार आहे. 

चालू वर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादकांबरोबरच मराठवाड्यातील केशर आंबा उत्पादकही सहभागी होणार आहेत. आंबा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून आंबा विक्री सुरू झालेली आहे, असे आवाहन कृषि पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दिपक शिंदे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.