रांजणगाव गणपती – अक्षय तृतीयानिमित्त महागणपतीस आंब्यांची आरास करण्यात आली होती.
दरवर्षी हा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो, मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने विधीवत व पारंपरिक रीतीने पूजाअर्चा करून महागणपतीस आंब्याचा नैवेद्य दाखवून अक्षय तृतीया साजरी करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे व्यवस्थापक बाळासाहेब गोरे, पुजारी प्रसाद कुलकर्णी, मंदार कुलकर्णी आदी उपस्थित होते.