पुणे- दुध आणण्यासाठी पायी चाललेल्या महिलेची मंगळसूत्र हिसकावण्यात आले. ही घटना वडगाव येथील गणेशनगर रस्त्यावर घडली. याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी 46 वर्षीय महिला गणेशनगर येथील समता सोसायटीमध्ये रहातात. त्या रविवारी दुपारी दुध आणण्यासाठी दुकानात गेल्या होत्या. घरी दुध घेऊन परतत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. मंगळवूत्राची किंमत 32 हजार रुपये इतकी होती. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मिसाळ करत आहेत.