मंगळुरू : सुधारित नागरिकत्व कायद्या विरोधात (का) सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात कोणीही जखमी झाले नसल्याचा दावाव पोलिसांनी केला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती तणावाची बनताच प्रथम लाठीमार करण्यात आला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात न आल्याने हवेत होळीबार करण्यात आला. पोलिसांनी हवेत गोळीबार करण्याचा दावा केला असला तरी छयायचित्रात पोलिसांच्या बंदुका निदर्शकांच्या दिशेने असल्याचे चित्र दिसत आहे.
बंदराजवळील भागात निदर्शकांचा जमाव हिंसक बनला. त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. मंगळुरूमध्ये निदर्शकांनी प्रतिबंधात्मक आदेश धुडकावून लावले.
(हि घडणारी घटना असल्याने त्याबाबतची तपशील लवकरच)