मनेका गांधी बनणार लोकसभेच्या हंगामी सभापती

नवी दिल्ली -तब्बल आठव्यांदा खासदार बनलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मनेका गांधी यांना 17 व्या लोकसभेच्या हंगामी सभापती बनण्याचा मान मिळणार आहे. हंगामी सभापतीपदासाठी मनेका यांचे नाव निश्‍चित झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. मावळत्या एनडीए सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.

लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे कर्तव्य हंगामी सभापतींना पार पाडावे लागते. नव्या लोकसभेची पहिली बैठक हंगामी सभापतींच्या अध्यक्षतेखाली होते. त्या बैठकीत सभापती आणि उपसभापतींची निवड केली जाते. साधारणपणे सर्वांत ज्येष्ठ खासदाराला हंगामी सभापती बनवले जाते. मनेका यावेळी उत्तरप्रदेशच्या सुलतानपूर मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.