मध्य प्रदेशातील मध्यपीसांठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील मंदसौर जिल्ह्यात प्रशासनाने दारू पिणाऱ्यांसाठी विशेष सूट जाहीर केली आहे. आता त्यांना 10 टक्के कमी दरात दारू मिळणार आहे. मात्र, त्यासाठी एक अटही घातली आहे. दारूवर सूट मिळवण्याठी करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तिस ही सुट देण्यात येणार आहे. ही सुट फक्त बुधवारपर्यंतच देण्यात आली आहे.
Madhya Pradesh: Three liquor shops in Mandsaur city will give a discount of 10% to fully-vaccinated customers on the production of the vaccination certificate starting tomorrow, as per District Excise Officer
— ANI (@ANI) November 23, 2021
मंदसौर जिल्ह्यात बुधवार, 24 नोव्हेंबर रोजी महा-लसीकरण मोहीम आयोजित केली जाणार आहे. लसीकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी मंदसौर प्रशासनाने ही युक्ती शोधून काढली असून करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना दारू खरेदीवर 10 टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी दारू खरेदी करणाऱ्या व्यक्तीला लसीच्या दोन्ही डोसचे प्रमाणपत्र दुकानावर दाखवावे लागणार आहे. याबाबतचा आदेश जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी काढले आहेत.
प्रशासनाच्या या आगळ्यावेगळ्या पाऊलामागे लोकांमध्ये लसीबाबत जागरुकता निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे हा उद्देश आहे. मंदसौर शहरातील फाटक, भुनिया खेडी आणि जुने बस स्टँड येथील तीन दुकानांमध्ये विशेष सवलतीत दारू देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याआधीही जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांना भेटवस्तू देण्याचे मार्ग अवलंबले गेले आहेत.
यापूर्वी मध्य प्रदेशातील खांडवामध्ये करोना लसीचे दोन्ही डोस न मिळालेल्या व्यक्तीला दारू न देण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. या आदेशावरून बराच वाद झाला होता. यानंतर जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर खुलासा करताना सांगितले की, दारू पिणारे कधीही खोटे बोलत नाहीत, नेहमी खरे बोलतात.