मल्लखांबचे प्रशिक्षक उदय देशपांडेयांना जिवन गौरव पुरस्कार
मुंबई – भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधनाला महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2017-18 या वर्षामध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो. स्मृतीने गेल्या वर्षात दमदार कामगिरी करत या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. तर, मल्लखांब या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडेयांना शिव छत्रपती क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर, माऊंट एव्हरेस्ट, किलीमांजरो सारखी शिखरं सर करणाऱ्या प्रियंका मोहितेला साहसी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
राज्यातील क्रीडा क्षेत्रातील मानाचे समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहे. 17 फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे. 2015 नंतर 3 वर्षे हे पुरस्कार वितरित करण्यात आले नव्हते. या पुरस्कारांच्या निकषांमध्ये काही त्रुटी असल्याच्या तक्रारी क्रीडा विभागाकडे आल्या होत्या. त्यानंतर यावर विचारविनियम करून 3 वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे प्रदान करण्यात आले होते.
क्रीडा पुरस्कारामध्ये आर्चरी, थलॅटिक्स, ट्रायथलॉन, वुशु, स्केटिंग, हॅण्डबॉल, जलतरण, कॅरम, जिम्नॅस्टीक, टेबल टेनिस, तलवार बाजी, बॅडमिंटन, बॉक्सींग, रोईंग, शुटींग, बिलियर्डस ण्ड स्नूकर, पॉवर लिफ्टील, वेट लिफ्टींग, मलखांब, आट्यापाट्या, कबड्डी, खोखो, कुस्ती, बुध्दीबळ, लॉन टेनिस, हॉलीबॉल, सायकलींग, स्क्वॅश, क्रिकेट, हॉकी या विभागातील 55 खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे 2017-18 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक/कार्यकर्ते या विभागात 7 पुरस्कारांचा तर एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू यामध्ये 9 पुरस्कारांचा समावेश आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 15 जणांना घोषित करण्यात आला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा