ऑकलंड – न चालणारा संसार, नात्यातील जाच, नवऱ्याची निष्क्रीयता या सगळ्याला कंटाळून तिने वयाच्या 26 व्या वर्षी बिनकामाच्या लग्नाला अलविदा केला. पंजाबमधील माळवा प्रांतातील या तरुणीने थेट न्यूझीलंड गाठले. आज तेथील पोलिस दलात ती सिनियर सार्जंट पदावर काम करत आहे.
मनदीप कौर. तिचे नाव. दोन मुलांची आई असलेल्या 33 वर्षांच्या मनदीप कौरने 2002 मध्ये तिने पहिल्यांदा स्विमिंगसूट घातला होता. त्याआधी कधीही तिने परक्या पुरुषांसमोर स्विमसूट घातलाच नव्हता. यावेळी मात्र न्यूझीलंडमधी पोलिस दलातील नोकरीला पात्र ठरण्यासाठी तिने स्विमसूट घालून पाण्यात उडी घेतली. ते वर्ष होते 2002. आज तब्बल दोन दशकांनंतर न्यूझीलंडमधील वर्तमानपत्रात बातम्या आहेत की, भारतीय वंशाची मनदीप कौर सिनियर सार्जंटपदी.
52 वर्षीय मनदीप यांच्या शांत पण ठाम सुरातून त्यांचे काम बोलत असते. त्यामागे त्यांचा भूतकाळ असतो. लग्न तोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ती चिंताक्रांत पण मनाशी ठाम होती. 1996 मध्ये पंजाबमधील एका छोट्या शहरातील पांरपारिक-जुन्या विचारांच्या आईवडिलांना तिचा निर्णय मानवणारा नसतो. इंग्रजी अगदी मोडकीतोडकी ओळख असताना वयाच्या 26 व्या वर्षी ती ऑस्ट्रेलियात आली आणि दोन दशकांच्या संघर्षानंतर न्यूझीलंडमध्ये पोलिस दलात सिनियर सार्जंट म्हणून काम करताना स्वतःची ओळख आणि प्रतिष्ठा प्राप्त केली आहे
अगदी टिपिकल पंजाबी घरात घडते तसे मनदीप कौर यांच्या बाबतीत घडले. मनदीप धुणे धूत होती. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणारे शर्मा एक दिवस तिच्या वडिलांना सांगत होते, माझा मुलगा ऑस्ट्रेलियाला नोकरीसाठी गेला आणि आजच त्याने कमाईतून 60,000 रुपये पाठवले. मनदीपचे कान टवकारले.
नवऱ्याला घटस्फोट देऊन दोन मुलांना घेऊन आलेली मनदीपला सारखे वाटत होते की, आपण आईवडिलांसाठी ओझे बनलो आहोत, अशी भावना सतत तिच्या मनात येत असे. मग तिने व्हिसासाठी अर्ज करण्याची परवानगी द्यावी म्हणून आईला गळ घातली. एप्रिल 1996 मध्ये विमानात बसून ती ऑस्ट्रेलियाला निघाली. त्यावेळी तिचा मुलगा आठ वर्षांचा आणि मुलगी सहा वर्षांची होती. त्यांना आई परदेशी जात असल्याचे सांगितले नव्हते. कारण, तिने सासऱ्यांशी लढून मुलांचा ताबा मिळवला होता आणि परत सासरचे लोक मुलांना घेऊन जातील अशी भिती तिला वाटत होती.
सिडनीमध्ये तिने पेट्रोल पंपावर काम केले, घरकामे केली, घरोघरी जाऊन टेलिकॉम सेवा विकली. तीन वर्षांनी तिने न्यूझीलंडला जायचे ठरवले. तिथे ती टॅक्सीचालक म्हणून काम करू लागली. ती राहत असेल्या ऑकलंड होस्टेलमध्ये जॉन पेगलर रिसेप्शनिस्ट होते. ते निवृत्त पोलिस अधिकारी होते.
त्यांच्या सेवाकाळातील अनेक किस्से गोष्टी ते सांगत. त्याचवेळी लहानपणी आई जेव्हा लष्करी अधिकारी, हवाई दलातील अधिकारी आणि पोलिस यांच्याविषयी बोलायची त्यावेळच्या आठवणी जागा व्हायच्या. पेगलर यांच्या प्रोत्साहनामुळे तिने पोलिस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला.
पोलिस दलाचा प्रतिष्ठेचा गणवेश प्राप्त करण्यासाठी तिला 2.4 किलोमीटरचे अंतर 11 मिनिटे वीस सेंकदात धावून पार केले. 54 सेकंदात पोहत 50 मीटरचे अंतर पार करावे लागले. त्याचबरोबर तब्बल वीस किलो वजन कमी करावे लागले.
आता त्यांना पदोन्नती मिळून त्या सिनियर सार्जंट झाल्या आहेत. तेथील भारतीय समुदायाला अनेकदा तक्रार दाखल करताना भाषेच्या अडचणी येतात. आता त्यांना मनदीप कौर यांचा आधार मिळाला आहे. त्याचबरोबर अन्याय, अत्याचार सहन करण्यात जगणाऱ्या भारतातील महिलांसाठी मनदीप कौर दीपस्तंभाप्रमाणे आदर्श आहेत.