वाघोली (पुणे) – आव्हाळवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंदाताई अशोक सातव पाटील यांची निवड झाली आहे. आव्हाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने मंदाताई सातव यांच्या उपसरपंचपदी निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सुरेखा दादासाहेब सातव पाटील, माजी उपसरपंच पिराजी आव्हाळे, शिव हिराई पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सारीका आव्हाळे, अशोक सातव पाटील आदी उपस्थित होते. हवेली तालुका पंचायत समितीचे उपसभापती नारायण आव्हाळे यांनी देखील मंदाताई सातव यांच्या उपसरपंच पदी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.