मंचर (प्रतिनिधी) – चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील मेंढपाळ बबन भागा सुळ या 65 वर्षीय मेंढपाळांवर ( shepherd ) बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची केल्याची घटना बुधवार (दि. 9) सायंकाळी 6 वाजता घडली. (Leopard attack on a shepherd in Chandoli)
गेल्या पंधरा दिवसात चार नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा युवा सेना प्रमुख प्रवीण थोरात यांनी वनखात्याने चांडोली बुद्रुक परिसरात तीन ते चार ठिकाणी पिंजरे लावून या परिसरात असणारे बिबटे ( Leopard )जेरबंद करावे अशी मागणी केली आहे.
चांडोली बुद्रुक येथे 15 दिवसांपूर्वी वेताळेमळा परिसरात चार दिवसांच्या फरकाने तीन जणांवर बिबट्यांचे हल्ले केले होते. त्यातील जयदीप थोरात व ओमकार थोरात या युवकांनी बिबट्याचा हल्ला परतवला होता. त्यानंतर दहा बारा दिवसांनी वेताळ मळा येथेच लक्ष्मण चौरे हे दुचाकीवर जात असताना त्यांच्यावरही हल्ला केला होता; मात्र त्यांनी आपली मोटरसायकल जोरात पळवून हल्ला चुकविला. त्यानंतर पाच मिनिटात संतोष चिमण थोरात यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले.
वाघाळेमळा शाळेजवळ बबन भागा सूळ या मेंढपाळावर बिबट्याने हल्ला केला. पहिला हल्ला झाल्यावर त्या ठिकाणी पिंजरा लावला होता, त्यात एक बिबट्या पकडण्यात वन खात्याला यश आले. दुसऱ्या हल्ल्यानंतर पिंजरा लावला त्यात बिबट्याला पकडण्यात वन खात्याला यश आले नाही.
चांडोली बुद्रुक परिसरात तसेच आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात रोज अनेक ठिकाणी पशुधन अथवा मानवावरही बिबट्याचे हल्ले होत असताना अनेक ठिकाणी वनखाते मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप माजी उपसरपंच संदीप थोरात यांनी केला आहे.